एक्स्प्लोर
Saamana On Narendra Modi : पंतप्रधान जातीयता धर्माधता वाढवून राजकारण करत असल्याची सामनातून टीका
‘सामना’ वृत्तपत्राच्या ‘रोखठोक’ सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा संदर्भ देत जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘बुळ्या बावळ्या कुळ्यांना जुलवून एका विशिष्ट वर्गाची तुमडी भरणारे हे एक पाजी कोतांडं असल्याचे परखड मत प्रबोधनकारांनी निर्भीडपणे मांडलं,’ असा उल्लेख करत सध्याच्या राजकारणावर तोफ डागली आहे. पंतप्रधान स्वतःला ईश्वरी अवतार समजत असून, जातीयता आणि धर्मांधता वाढवून राजकारण करत असल्याचा आरोप या सदरात करण्यात आला आहे. भाजप आणि संघाकडून देवळांचे राजकारण हा एक 'धंदा' म्हणून चालवला जात असून, प्रबोधनकारांनी अशा धंद्यालाच विरोध केला होता, असेही म्हटले आहे. या टीकेची तुलना पीएम केअर फंडाशी (PM Cares Fund) करत, पंतप्रधानांनी सेवाधर्माच्या नावावर पैसे जमा केले, पण ते सत्कार्यासाठी वापरले नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाटल्यानंतर झालेला वाद आणि सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा झालेला प्रयत्न, या घटनांमुळे हे सदर लिहिल्याचे म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















