Pigeon Politics: कबूतरांवरून धर्माच्या नावावर हिंसा? सामनाचा सरकारवर निशाणा
Continues below advertisement
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून कबुतर प्रकरणावरून जैन समाजाला लक्ष्य करत मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 'कबूतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो, हे फक्त मोदी काळातच घडू शकतं,' असा थेट हल्लाबोल या अग्रलेखात करण्यात आला आहे. मुंबईतील कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावर 'सामना'ने उपरोधिक भूमिका घेतली आहे. फडणवीस सरकारने अध्यादेश काढून जैनांवरील तथाकथित अन्याय दूर करावा, असे यात म्हटले आहे. तसेच, मुंबईतील लोढा टॉवर्सच्या गच्ची, जैन बिल्डरांच्या इमारतींची मैदाने आणि मरीन लाइन्स येथील जैन जिमखान्यावर सरकारने कबुतरखाने सुरू करण्याची घोषणा करावी, असा टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement