एक्स्प्लोर
Solapur Protest: 'मला न्याय मिळाला पाहिजे', गृहमंत्री Fadnavis यांच्या कार्यक्रमात तरुणाची घोषणाबाजी
सोलापूर मुंबई विमानसेवा सुरु होण्याच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. 'मला न्याय मिळायला पाहिजे' अशी घोषणाबाजी करत एका तरुणाने गोंधळ घातला. पोलिसांनी तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही, त्यामुळे हा तरुण थेट मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करण्यासाठी आला होता. मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण सुरू असताना या व्यक्तीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाची नेमकी तक्रार काय होती, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही, पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















