Rohit Pawar PC : मतदार यादीत मोठा घोळ? रोहित पवारांचे पुराव्यांसह गंभीर आरोप

Continues below advertisement
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवर (Election Process) गंभीर आरोप केले आहेत. मतदार यादीत (Voter List) मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा दावा करत त्यांनी यासाठी भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) जबाबदार धरले आहे. 'लोकशाहीचा गळा दाबून तुम्ही संविधानाला धोक्यात आणत आहात,' असा थेट हल्लाबोल रोहित पवारांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ५४ हजारांहून अधिक बोगस नावे घुसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी पुराव्यांसह केला. भाजपच्या पदाधिकारी देवांगी दवे (Devangi Dave) या निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळत असून, त्यांच्या माध्यमातूनच माहितीमध्ये फेरफार केली जात आहे, असा दावाही पवारांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, बीएलओच्या (BLO) डायरी आणि लॉगिंग डेटाची तपासणी व्हावी, तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर (Ballot Paper) घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola