एक्स्प्लोर
Maharashtra Land Scam | रोहित पवार यांचा Sanjay Shirsat यांच्यावर 5000 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. भिवलकर कुटुंबिय सिडकोच्या निकषात बसत नसतानाही त्यांना पाच हजार कोटी रुपयांची जमीन दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यातून शिरसाट यांच्याकडे पार्टी फंड आणि वैयक्तिक फंड असे एक हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोपही पवारांनी केला आहे. या प्रकरणात अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबलवरुन फाइली बुलेट ट्रेनच्या वेगाने फिरल्याचे रोहित पवार म्हणाले. "भ्रष्टाचार्याच्या फाइली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान" अशी आजची परिस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी बॅगभर बारा हजार पानांचे पुरावे आपल्याकडे असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. हे पुरावे पेन ड्राइव्हमध्येही उपलब्ध असून ते फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले जातील असेही ते म्हणाले. शिरसाट यांना हॉटेल, एमआयडीसीमध्ये भूखंड, त्र्यंबकेश्वरमध्ये जमीन आणि मुंबईच्या आसपास अनेक बिल्डिंग सुरू करायच्या होत्या असाही आरोप रोहित पवारांनी केला.
महाराष्ट्र
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र


















