एक्स्प्लोर
Voter Data: 'वेबसाईट वापरून मतदार यादीत घोळ', Rohit Pawar यांचा BJP चे Devang Dave यांच्यावर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे (BJP) देवांग दवे (Devang Dave) यांच्यात निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वेबसाइटवरून नवा वाद पेटला आहे. 'स्वायत्त संस्थेची वेबसाईट हँडल करण्याची जबाबदारी भाजपच्या पदाधिकाऱ्याला दिली, आमच्या आधी सर्व माहिती दवेकडे होती', असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. मतदार यादीत माहिती अॅड किंवा मायनस करण्यासाठी दवे यांनी उमेदवारांना विश्वासात घेतले, असेही पवार म्हणाले. या आरोपांना उत्तर देताना देवांग दवे यांनी, 'महाराष्ट्रात एवढी सगळी कामं मी एकटाच करतो की काय? असा भ्रम निर्माण होतो', असा टोला लगावला. लोकांची मनं जिंकायची असतील तर लोकांमध्ये जाऊन कामं करावी लागतील, असे बिनबुडाचे आरोप करून काहीही सिद्ध होत नाही, असा सल्लाही दवे यांनी पवारांना दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















