Sambhajinagar Murder: 'धारदार शस्त्रांनी वार', CCTV फुटेजमुळे तरुणाच्या हत्येचे आरोपी जेरबंद
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा (Rohit Arya) पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे, संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 'शार्प एज वेपन्स, धारदार शस्त्रांचा इस्तेमाल हुआ है,' अशी माहिती पोलिसांनी संभाजीनगर हत्या प्रकरणावर दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. तोंडाला रुमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. तर, रोहित आर्यवर मध्यरात्री अडीच वाजता पत्नी, मुलगा आणि इतर काही नातेवाईक अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement