Maha Civic Polls: महायुतीत स्थानिक निवडणुकीवरून ठिणगी, नेते स्वबळाच्या तयारीत? Special Report
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने महायुतीमध्ये नेते स्वबळाची भाषा बोलू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एकत्र, पण ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देताच, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी, ‘ईद का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते है’, असा थेट इशारा दिला आहे. दुसरीकडे भंडारा-गोंदियामध्ये भाजपने ८०% जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा करत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड आणि सिंधुदुर्गातही मैत्रीपूर्ण लढतीची तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी आधी स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढत लढून नंतर सत्तेसाठी एकत्र येण्याचा फॉर्म्युला महायुती वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement