Battleground Thane: 'अब की बार ७० पार', ठाण्यात BJP चा नारा, Eknath Shinde गटात नाराजीचा सूर

Continues below advertisement
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्येच विसंवादाचे चित्र दिसत आहे. भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना, या दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 'अब की बार सत्तर पार, भाजपाचाच महापौर' असा नारा देत भाजपने आगामी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. दुसरीकडे, खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि स्वबळावर लढण्याची मागणी केली. दोन्ही मित्रपक्षांनी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता दोन्ही पक्ष वेगळे लढल्यास नेमकी सरशी कोणाची होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola