Special Report Mahayuti: 'धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवू', सामंतांचा नेमका रोख कुणाकडे?
Continues below advertisement
कोकणातील महायुतीतील अंतर्गत राजकारण तापले असून शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) आणि पुण्यातील जैन हॉस्टेलच्या जागेच्या वादामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) चर्चेत आहेत. 'आपला धनुष्यबाण कसा चालतो हे एकदा दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे', असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि राष्ट्रवादीत इनकमिंग वाढल्याने सामंत यांनी मित्रपक्षांनाच इशारा दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, पुण्यातील जैन हॉस्टेलच्या मोक्याच्या जागेवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजू शेट्टी (Raju Shetti) आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मोहोळ यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement