एक्स्प्लोर
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अंतर्गत विरोध?; भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी सोबत नको?
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून अंतर्गत कलह वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'आम्ही तिघं बसून तो निर्णय घेऊ... त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा'. [N/A] भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेकडून झालेल्या त्रासाचा पाढा वाचत, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेसोबत जुळवून घेऊ पण राष्ट्रवादीसोबत नको, अशी भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [N/A] यावरून मराठवाड्यात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















