एक्स्प्लोर
Renuka Thakur World Champions: लेकीने वर्ल्ड कप जिंकला, रेणुका ठाकूरच्या आईच्या डोळ्यात पाणी
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे. वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरच्या आईला या विजयानंतर आनंदाश्रू अनावर झाले. 'इंडियाने वर्ल्ड कप जितलाय, बहुत खुशी हो रही आज', अशी भावूक प्रतिक्रिया रेणुका ठाकूरच्या आई सुनीता ठाकूर यांनी दिली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना त्या खूप भावूक झाल्या होत्या. संपूर्ण देश आणि प्रदेश या विजयाने आनंदी असल्याचेही त्यांनी म्हटले. भारताच्या या शानदार कामगिरीचे कौतुक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















