RBI holds repo rate : रेपो रेट पुन्हा एकदा जैसे थे, 6.5 टक्क्यांवर रेपो रेट #abpमाझा
RBI holds repo rate : रेपो रेट पुन्हा एकदा जैसे थे, 6.5 टक्क्यांवर रेपो रेट #abpमाझा
मुंबई : देशाच्या पतधोरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळीही रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जैसे थेच ठेवला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट (व्याज दर) हा 6.5 टक्क्यांवर कायम असेल. आरबीआयने सलग 11 व्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे धोरण अवलंबले आहे.
तुमच्या ईएमआयवर काय परिणाम पडणार?
सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. यावेळीही आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरासाठी, वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेल्यांना यावेळीह दिलासा मिळालेला नाही. म्हणजेच यावेळीही कर्जावरील व्याज कमी होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच तुमच्या घराच्या कर्जाचा, वाहन खरेदी करण्यासाठी घेतलेल्या तसेच इतर कर्जाचा हप्ता यावरील व्याज कायम राहणार आहे. ते कमी किंवा जास्त होणार नाही.
रेपो रेट यावेळीही कायम
शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळीही आरबीआयने रेपोरेट कायम ठेवला आहे. त्यामुळे सलग 11 व्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच आर्थिक विकास दर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. महागाई दरात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात महागाई दर 4.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2025 मध्ये महागाई दर पहिल्या तिमाहीत 4.6 टक्के तर दुसऱ्या तिमाहीत 4 टक्क्यांवर राहण्याची शक्यताही शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे.