एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar धंगेकरांचा Chandrakant Patil यांच्यावर निशाणा, पुण्याच्या गुन्हेगारीवरून घेरलं
पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून समीर पाटील हा माझ्यावर गुन्हे दाखल करून मोक्का (MCOCA) लावण्याचा प्रयत्न करत आहे', असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांच्या मते, समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता असून त्याच्यावर सांगलीमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तो मोक्कातील आरोपी होता. पुणे शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जबाबदार असून, पालकमंत्री म्हणून त्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली. त्याचबरोबर, कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















