Rauf Azhar killed in Bahawalpur in Operation Sindoor : मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा
Rauf Azhar killed in Bahawalpur in Operation Sindoor : मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील बहवालपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या जैश-ए- मोहम्मदचं मुख्यालय मरकज सुबहान अल्लाहवर हल्ला करत मसूद अझहरचं कंबरडं मोडलं. यात मसूद बचावला असला तरी त्याच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवादी नेता मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या आत 100 किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर आणि इतर 8 तळांवर हल्ला केला. दरम्यान, कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहाची रांग लागली आहे. पाकिस्तानातून बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर बहावलपूरमधून फोटो आले आहेत.