Ranjitsinh Naik-Nimbalkar on Phaltan Case : महिलांनी दृष्ट काढली, रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
Continues below advertisement
फलटणमधील (Phaltan) महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 'या प्रकरणात मी पूर्णपणे निर्दोष आहे', असे म्हणत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दाखवलेल्या व्हिडिओवरून रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावरही निशाणा साधला. पत्रकार परिषदेनंतर, आपण निर्दोष असल्याचे सांगितल्यावर काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांची दृष्ट काढली, तर कार्यकर्त्यांनी त्यांना दुग्धाभिषेक घातला. या भावनिक प्रसंगी रणजितसिंह निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement