Ranjit Kasle in Beed : रणजीत कासलेला कॉलर धरुन बीडला आणलं, EXCLUSIVE VIDEO
Ranjit Kasle in Beed : रणजीत कासलेला कॉलर धरुन बीडला आणलं, EXCLUSIVE VIDEO
रणजीत कासलेला घेऊन पोलीस बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल रंजीत कासलेला पुण्यातून बीड पोलिसांनी अटक केली अटक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कासलेला पोलीस बीडला घेऊन आले आहेत स्थानिक गुन्हे शाखा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवाजीनगर पोलिसांना कासलेला स्वाधीन करणार आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कासले विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे तर कासलेला पोलीस सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आले आहे
हे ही वाचा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed News) जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळालं. याचदरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे.
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील, असंही रणजीत कासले म्हणाले. आता वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल माध्यमांवर देखील रणजीत कासले यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.