Anil Parab on Kadam : बाळासाहेबांच्या मृत्यूवरुन राजकारण, रामदास कदम - अनिल परब भिडले
Continues below advertisement
रामदास कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्यापासून सुरू असलेला वाद अजूनही सुरू आहे. रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या सेनेचे आमदार अनिल परबांवर अनेक आरोप केले. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी मातोश्रीवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांची नावं जाहीर करण्याचं आव्हान कदमांनी परबांना दिलं. कदमांनी अनिल परबांवर विलेपार्लेच्या एसआरएमध्ये बिल्डरकडून दोन Mercedes मिळवल्याचा थेट आरोप केला. परबांनी आठ हजार मराठी रहिवाश्यांना शाखेमध्ये बोलावून दम दिला आणि त्यांचे फ्लॅट खाली करायला लावले, फक्त एका वर्षाचे भाडे देऊन कोट्यवधी रुपये कमावले, असा गंभीर आरोपही कदमांनी केला. या आरोपांवर अनिल परबांनी रामदास कदमांच्या पत्नी जळाल्या की जाळलं, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कदमांच्या पत्नी ज्योती कदम यांनी माध्यमांसमोर येत उत्तर दिलं. अनिल परब यांनी केलेल्या आरोपांनंतर मी आणि माझी पत्नी कोर्टामध्येच जाणार असल्याचे रामदास कदमांनी म्हटलं. "बाळासाहेब राहिले असते तर आज अनिल परब यांना लाच मारली असती," असा घणाघातही रामदास कदमांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement