ABP News

Ramdas Athwale Oath Modi 3.0 : मै रामदास आठवले, मोदींच्या 3.0 मंत्रिमंडळात शपथविधी

Continues below advertisement

Ramdas Athwale Oath Modi 3.0 : मै रामदास आठवले, मोदींच्या 3.0 मंत्रिमंडळात शपथविधी

हे देखील वाचा

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पीएम मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. 

पीएम मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. तर नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. गृथ आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram