एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'प्रकाश आंबेडकर आणि आपल्या भेटी वाढल्या पाहिजेत' - Ramdas Athawale
केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (RPI) प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पुन्हा एकदा महायुतीत (Mahayuti) सामील होण्याची ऑफर दिली आहे. 'प्रकाश आंबेडकर आणि आपल्या भेटी वाढल्या पाहिजेत', असे सूचक वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. याआधीही आठवले यांनी आंबेडकरांना युतीसाठी निमंत्रण दिले होते, मात्र त्यावेळी वंचितकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) संभाव्य युतीच्या चर्चांवर बोलताना, त्याचा महायुतीवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणे शक्य आहे तिथे एकत्र लढू आणि जिथे शक्य नाही तिथे पक्ष स्वबळावर लढतील, असेही आठवले यांनी नमूद केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















