Pune Land Deal: '...तोपर्यंत आमचा लढा संपत नाही', माजी खासदार Raju Shetti यांचा Gokhale Developers ला इशारा

Continues below advertisement
पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन ट्रस्टच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. Gokhale Developers आणि H&D ट्रस्ट यांच्यातील या व्यवहारावर शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेतला. 'हे खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डवर एच अँड डी होल्डिंग्जचं नाव जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत आमचा लढा संपत नाही,' असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. हा वाद पुण्यातील सुमारे साडेतीन एकर जागेचा असून, त्यावर जैन समाजाचे वसतिगृह आणि मंदिर आहे. हा व्यवहार रद्द करण्याची मागणी सकल जैन समाजाने केली असून, या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही सहभाग असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे, तथापि मोहोळ यांनी हे आरोप फेटाळले आहेत. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणी 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola