Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

Continues below advertisement

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा चांगलाच चर्चेत आला.  अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या घटनेनंतर अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानंतर फोटो उतरवणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  सखोल भाष्य केलं आहे. मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यावेळी राज ठाकरे बोलत होते. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola