Zero Hour: 'मुख्यमंत्रीपदासाठी चाटुगिरी', शिंदेंवर राज ठाकरेंचा हल्लाबोल ABP Majha

Continues below advertisement
मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या मोर्चाच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'नमो टुरिझम सेंटर्स'च्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. 'मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?', असा थेट सवाल करत राज ठाकरेंनी शिंदे सरकारच्या निर्णयावर टीका केली. शिवनेरी, रायगडावर अशी केंद्रे उभारल्यास ती फोडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई केली जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola