Raj Thackeray Speech : मराठी माणसाच्या थडग्यावर प्रगती होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी समूहावर जोरदार टीका केली आहे. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग संपादित करून अदानी पॉवर प्रोजेक्ट उभारणार असल्याचा आणि त्यासाठी जंगलतोड करणार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. 'मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, तर मी ते खपवून घेणार नाही,' असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या मते, अटल सेतू आणि सी-लिंकसारखे प्रकल्प सामान्य नागरिकांसाठी नसून, उद्योगपतींच्या जमिनींच्या सोयीसाठी बांधले जात आहेत. आमच्याच मराठी माणसांना दलाल बनवून जमिनी मिळवल्या जात आहेत आणि याला केंद्र व राज्य सरकारचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement