Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

Continues below advertisement

 एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही. राज्यपाल आणि सुप्रीम कोर्टाला सांगूनच करावं लागेल. हा १९५०चा नियम आहे. हा काही अपवाद नाही, असं राज ठाकरे यांनी एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांना सांगितलं. तसंच ९ किंवा १० तारखेला विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबईत यावं. आपण प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी काम करूया असं राज ठाकरे म्हणाले.


पुण्यात रोहित पवारांच्या एमपीएससी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज ठाकरेंनी हजेरी लावली...मात्र यावेळी राज ठाकरेंनी अतिशय परखड शब्दात विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली...दुसरं कोणतंही सरकार आलं तरीही ७० हजार पदांची भरती होणार नाही हे लक्षात ठेवा अशी वस्तुस्थिती राज ठाकरेंनी मांडली...विशेष म्हणजे रोहित पवारांसमोर राज ठाकरेंनी ही वास्तवदर्शी भाष्य केलं...२०२३ मध्ये जरांगेंच्या मंचावरही राज ठाकरेंनी अशीच परिस्थितीची जाणीव करून दिली होती...आरक्षणाचा निर्णय हा मंचावर बसून किंवा आंदोलनातून होणार नाही...तर तो न्यायालयातून सुटू शकतो असं थेट भाष्य  राज ठाकरेंनी जरांगेंच्या मंचावर केलं होतं...त्यामुळे आपण बोलतो ते कटू असतं लोकांना ते हळूहळू कळतं अशा शब्दात राज ठाकरेंनी परिस्थिती मांडली....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola