Maharashtra Politics : 'आधीचा सिनेमा Mumbai-Pune साठी, हा महाराष्ट्राचा', Raj Thackeray स्पष्टच बोलले

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील भेट अखेर टळली आहे. 'याधीचा चित्रपट हा मुंबई पुणे ठाणे साठी होता पण हा चित्रपट महाराष्ट्राचा आहे', असे म्हणत राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटाचे कौतुक केले. मुंबईतील लोअर परेल येथील पीव्हीआरमध्ये हा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, ज्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. मात्र, पूर्वनियोजित असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील महत्त्वाच्या बैठकांमुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण करणारी ही भेट होऊ शकली नाही. राज ठाकरे यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट राज्यातील सद्यस्थितीवर एक भाष्य असून, तो ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola