Special Report Raj Thackeray : ९६ लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) हल्लाबोल करत राज्यात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 'जर महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, तर पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा,' असा थेट इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला. मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को सेंटरमध्ये (NESCO Centre) झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी मतदार याद्या साफ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असे आव्हान दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ दाखवत, निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच, सत्ताधारी आमदारानेच निवडणुकीत बाहेरून २० हजार मतदार आणल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओही त्यांनी सादर केला. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावत याला 'रडीचा डाव' म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement