Raj Thackeray : 'कल्याणमधील ४,५०० मतदार Malabar Hill मध्येही मतदान करतात'

Continues below advertisement
मुंबईत झालेल्या 'सत्याचा मोर्चा'मध्ये (Satyacha Morcha) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुबार मतदारांचा (Bogus Voters) मुद्दा उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. कल्याण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधील साडेचार हजार मतदार मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill) मतदारसंघातही मतदान करत असल्याचा दावा त्यांनी केला. 'साडेचार हजार मतदार या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे', असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी यादीतील काही नावे वाचून दाखवत हे मतदार यादीतील घोटाळ्याचे केवळ एक उदाहरण असल्याचे म्हटले. मतदार याद्या पूर्णपणे पारदर्शक करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. या मोर्चात महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी झाले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola