एक्स्प्लोर
Maharashtra Crime : आलिशान कारने रेकी, घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; UP तून Mastermind अटकेत
रायगड पोलिसांच्या (Raigad Police) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) एका मोठ्या आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचा सूत्रधार शाहनवाज कुरेशी (Shahnawaz Qureshi) याच्यासह तिघांना उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५.५० लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. 'मागील पाच-सहा महिन्यांपासून दिवसा घरफोडीचे प्रकार घडत होते, ज्यात मोठमोठ्या रेजिडेंशियल सोसायटीजला टार्गेट केलं जात होतं,' अशी माहिती पोलिसांनी दिली. ही टोळी रायगड, सातारा आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये सक्रिय होती आणि आलिशान कारचा वापर करून आधी रेकी करायची व नंतर घरफोड्या करायची. रायगड एलसीबीने तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीचा माग काढला आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने सिकंदराबादमध्ये ही कारवाई केली. या टोळीच्या अटकेमुळे एकूण १० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















