Rahul Gandhi X Post : मोदी गप्प का? पार्थ पवार प्रकरणी राहुल गांधींचं ट्वीट
Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना विचारले आहे की, 'मोदीजी, तुमची शांतता खूप काही सांगते - तुम्ही यासाठीच शांत आहात की तुमचं सरकार त्या लुटारुंवर टिकलेलं आहे, जे दलित आणि वंचितांचे अधिकार हिसकावून घेतात?'. राहुल गांधींनी आरोप केला आहे की, दलित समाजासाठी राखीव असलेली सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. इतकेच नाही तर या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीमध्येही (Stamp Duty) सूट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे, ज्यामुळे सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement