एक्स्प्लोर
Diwali 2025: 'तुमच्या लग्नाच्या मिठाईची वाट पाहतोय', Rahul Gandhi यांना दुकानदाराची कोपरखळी
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिवाळीनिमित्त दिल्लीतील २०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या घंटेवाला मिठाई (Ghantewala Sweet Shop) दुकानाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत स्वतः इमरती आणि बेसनचे लाडू बनवण्याचा अनुभव घेतला. 'तुमच्या लग्नाच्या मिठाईच्या ऑर्डरची आम्ही वाट पाहतोय,' असे मिठाई व्यापाऱ्याने म्हणताच राहुल गांधींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. या भेटीचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, 'दिवाळीची खरी गोडी केवळ थाळीतच नाही, तर नात्यांमध्ये आणि समाजातही असते,' असे त्यांनी म्हटले आहे. या ऐतिहासिक दुकानाने गांधी कुटुंबाच्या अनेक पिढ्यांना मिठाई पुरवली आहे. दुसरीकडे, राजकीय वर्तुळात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नावाची चर्चा आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रिकेट
Advertisement
Advertisement
















