Rahul Gandhi on Haryana Vote Chori: 'हरियाणातील सरकार चोरीचे, मुख्यमंत्री चोरांचे'

Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Elections) मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपा (BJP) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप करताना, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'तुमचे Chief Minister जे आहेत, ते चोरीचे Chief Minister आहेत,' असा थेट हल्ला राहुल गांधी यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत 'H-Files' सादर करत गांधींनी दावा केला की, हरियाणातील २ कोटी मतदारांपैकी २५ लाख मतदार बनावट होते, म्हणजेच प्रत्येक ८ पैकी १ मतदार बनावट होता. एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावांनी २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला. यावर पलटवार करताना किरेन रिजिजू म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळेच त्यांचा पराभव झाला, हे कुमारी शैलजा (Kumari Selja) यांनी आधीच सांगितले होते. निवडणूक आयोगानेही राहुल गांधींचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola