एक्स्प्लोर
Rahul Gandhi : हरियाणातील सरकार अवैध, मुख्यमंत्री चोरीचे - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) हरियाणा निवडणुकीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'तुमची हरियाणातील सरकार एक अवैध सरकार आहे आणि तुमचे मुख्यमंत्री चोरीचे मुख्यमंत्री आहेत', असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या मते, निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आला, ज्यात लाखो बनावट आणि दुबार मतदारांचा समावेश आहे. 'हाऊस नंबर झिरो' (House Number Zero) असलेल्या मतदारांना बेघर म्हणण्याचा निवडणूक आयुक्तांचा दावा खोटा असल्याचे सांगत, गांधी यांनी काही उदाहरणे सादर केली. या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा सहभाग असून, त्यांनी मिळून लोकशाही संपवली आहे, असा आरोपही गांधी यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शेत-शिवार
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















