Pune Modern College मुळे बौद्ध तरुणाची London मधील नोकरी गेली', Sachin Kharat यांचा गंभीर आरोप

Continues below advertisement
पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (Modern College of Arts, Science and Commerce) आणि आरपीआय (खरात गट) नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांच्या आरोपामुळे नवा वाद पेटला आहे. प्रेम विराडे (Prem Virade) नावाच्या एका बौद्ध तरुणाला कॉलेजने शिफारस पत्र (Recommendation Letter) न दिल्यामुळे लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरील (Heathrow Airport) नोकरी गमवावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'मॉडर्न कॉलेजनं पत्र न दिल्यामुळे प्रेम विराडेला नोकरी गमवावी लागली', असा थेट आरोप सचिन खरात यांनी केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील, प्रेम दलित असल्यामुळेच कॉलेज प्रशासनाने जातीय भेदभावातून कागदपत्रे नाकारल्याचा आरोप केला आहे. याउलट, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे (Dr. Nivedita Ekbote) यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याची वर्तणूक समाधानकारक नसल्याने आणि संस्थात्मक नियमांनुसार शिफारस पत्र देण्यास नकार दिल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वी कॉलेजने प्रेमला उच्च शिक्षणासाठी शिफारस पत्रे दिली होती, त्यामुळे आता नोकरीसाठी नकार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola