एक्स्प्लोर
Caste Discrimination : मॉडर्न कॉलेजमुळे लंडनची नोकरी गेली? सचिन खरात यांचा बौद्ध तरुणाशी संवाद
पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, यावेळी एका माजी विद्यार्थ्याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे. प्रेम बिराडे या बौद्ध तरुणाने आरोप केला आहे की, कॉलेजने वेळेवर कागदपत्रे न दिल्याने त्याला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरील नोकरी गमवावी लागली. 'पुण्याच्या कॉलेजने माझी नोकरी घालवली', असा थेट आरोप प्रेम बिराडेने एका व्हायरल व्हिडिओमध्ये केला आहे. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली असून, केवळ दलित असल्यामुळेच प्रेमला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्याची वागणूक आणि शिस्तीच्या नोंदीमुळे शिफारस पत्र दिले गेले नाही, याचा त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीशी काहीही संबंध नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















