Dhangekar vs Mohol : धंगेकरांचा मोहोळांवर गंभीर आरोप, कारवाईच्या चर्चेनंतरही लढण्यावर ठाम
Continues below advertisement
पुण्यात (Pune) शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यातील वादामुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार,' असे म्हणत धंगेकरांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला असून, पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या टीकेनंतर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कारवाई करतील अशी चर्चा होती, मात्र शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement