एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar : मुरलीधर काल म्हणाले माझ्यावर एकही गुन्हा नाही, धंगेकरांनी दाखवले पुरावे
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस (Jain Boarding House) जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. 'ज्या पद्धतीनं या पुण्यामध्ये लूटमार करणारी टोळी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, ती नास्तेनाबूत करायला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब मागेपुढे पाहणार नाहीत,' असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा दाखला देत, मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटीसारखा (Atrocity Act) गंभीर गुन्हा दाखल असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. मोहोळ यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात बिल्डर लॉबीचा थेट सहभाग असून लवकरच आणखी दोन प्रकरणे समोर आणणार असल्याचा इशाराही धंगेकर यांनी दिला आहे. दरम्यान, मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement


















