एक्स्प्लोर
Morning Prime Time Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 7 AM : 01 NOV 2025 : ABP Majha
शिरूर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची दहशत वाढली असून, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सरकारला तीव्र इशारा दिला आहे. 'सरकार आमचा अंत पाहणार असेल तर वर्षा बंगल्यावरती आंदोलन करावं लागेल,' असे म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पिंपरखेड (Pimdarkhed) परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला आणि वनविभागाचे कार्यालय पेटवले. यानंतर, वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत. बिबट्याला शोधण्यासाठी शार्प शूटर्सच्या पाच पथकांसह, २५ पिंजरे आणि ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी बैठक घ्यायला वेळ आहे, पण बिबट्या प्रश्नावर नाही, अशी टीका केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















