Pune Land Scam: '९९% भागीदार असूनही Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही?', असा प्रश्न उपस्थित
Continues below advertisement
पुण्याच्या मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. '९९ टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत तर केवळ एक टक्का भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालाय', त्यामुळे आता पार्थ पवारांवर गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी (Amedia Enterprises LLP) या कंपनीसाठी जमीन खरेदी करताना संगनमत करून शासनाचा पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शीतल तेजवानी (जागेची पॉवर ऑफ अटर्नी), दिग्विजय पाटील (अमेडियाचे भागीदार), रवींद्र तारू (नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी) आणि सूर्यकांत येवले (तहसीलदार) यांच्यावर कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement