Ravindra Dhangekar : थोडी लाज असेल तर सोमवारपर्यंत गैरव्यवहार रद्द करावा - धंगेकर

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन व्यवहार प्रकरणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. धंगेकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dy CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून या प्रकरणात मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'जैन धर्मियांची जागा मुरलीधर मोहोळ यांच्या मान्यतेने त्यांच्या हस्तकांनी हडपलेली आहे, ती परत मुक्त करा आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊन जर यांची चूक असेल तर यांचा राजीनामा घ्या,' अशी स्पष्ट मागणी धंगेकरांनी पत्राद्वारे केली आहे. जोपर्यंत जैन समाजाला त्यांची जागा आणि मंदिर परत मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराही धंगेकर यांनी दिला आहे. या वादामुळे सत्ताधारी महायुतीमध्येच तणाव निर्माण झाला असून, धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola