Specail Report Pune Land: पुण्यातील जमिनीवरून मुरलीधर मोहोळ- राजू शेट्टी आमनेसामने
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जमिनीच्या व्यवहारावरून राजकारण तापले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'राजू शेट्टी हे नोरा कुस्तीचे भाई वाटतात मला,' असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. जैन समाजाने या जमीन विक्रीच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर, राजू शेट्टी यांनी मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याला उत्तर देताना मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि शेट्टींवर टीका केली. यापूर्वी, मोर्चाला संबोधित करताना शेट्टी यांनी, 'जो कोणी याच्यामध्ये आडवा येईल त्याला तोडवल्याशिवाय सोडायचं नाही,' असा इशारा दिला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement