Jain Bording Land Deal : बिल्डर Gokhale व्यवहार रद्द करणार, तरीही राजू शेट्टी आक्रमक
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या (Jain Boarding Trust) वादग्रस्त जमीन व्यवहारात बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी माघार घेतली असली तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. राजू शेट्टींनी 'आम्ही देव, देश आणि धर्मासाठी रामाचं राज्य आणणार आहोत, असं सांगणाऱ्यांनी खुलासा करावा, हेच का ते Ram Rajya?', असा थेट सवाल केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी फोन करून गोखलेंनी व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली, असं शेट्टींनी सांगितलं. मात्र, जोपर्यंत साडेतीन एकर जागेवरून गोखले डेव्हलपर्सचं नाव कमी होऊन ट्रस्टचं नाव लागत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही, असं शेट्टींनी स्पष्ट केलं. ट्रस्टच्या विश्वस्तांनी पुढे येऊन हा व्यवहार पूर्णपणे रद्द न केल्यास, येत्या १ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement