एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'व्यवहार रद्द करत आहे', बिल्डर Vishal Gokhale यांची माघार, पण २३० कोटींचं काय होणार?
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जागेच्या व्यवहारावरून निर्माण झालेला वाद आता नव्या वळणावर आला आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर आरोप झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी या व्यवहारातून माघार घेतली आहे. 'आम्ही हा व्यवहार रद्द करत असून आगाऊ दिलेले दोनशे तीस कोटी रुपये परत मिळावेत', अशी मागणी विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे केली आहे. मात्र, करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त पैसे परत करण्यास बांधील नसल्याने या २३० कोटींच्या परताव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांपुढे होणार असून, त्यांच्या निर्णयावरच या रकमेचे भवितव्य अवलंबून असेल. दुसरीकडे, व्यवहार रद्द झाला असला तरी जैन मुनी आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement

















