एक्स्प्लोर
Gun License Scandal : घायवळ बंधूंचे कारनामे उघड, पोलिसांकडून मोठा खुलासा
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुंड निलेश (Nilesh Ghaywal) आणि त्याचा भाऊ सचिन (Sachin Ghaywal) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. 'गृहराज्यमंत्र्यांचा का त्यांना लायसन्स देण्यात यावा ज्या पद्धतीने हे पत्र येत आहेत?' असा थेट प्रश्न या प्रकरणात उपस्थित होत आहे. एसीपी संभाजी कदम (ACP Sambhaji Kadam) यांनी दिलेल्या माहितीनुसार, घायघोळ बंधूंनी एका व्यावसायिकाच्या बिल्डिंगमधील १० फ्लॅट्स धमकी देऊन आणि बळजबरीने ताब्यात घेतले. हे फ्लॅट्स भाड्याने देऊन एक नातेवाईक अवैधपणे भाडे वसूल करत होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी Ghaywal टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अनेक गुन्हे दाखल असलेल्या सचिन घायघोळचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी नाकारला होता, मात्र गृहराज्यमंत्री कार्यालयाकडून शस्त्र परवाना देण्याबाबत पत्र आल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















