Pune College Row: मॉडर्न कॉलेजमुळे लंडनची नोकरी गेली? तरुणाचा गंभीर आरोप

Continues below advertisement
पुण्यातील मॉडर्न कॉलेज (Modern College) आणि माजी विद्यार्थी प्रेम बिऱ्हाडे (Premvardhan Birhade) यांच्यातील वाद चिघळला आहे. कॉलेजने कागदपत्रे न दिल्याने लंडनमधील नोकरी गेली, असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केला आहे, तर कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे (Nivedita Ekbote) यांनी हे आरोप फेटाळले आहेत. प्राचार्यांच्या मते, प्रेम बिऱ्हाडे सोशल मीडियाचा गैरवापर करून कॉलेजची बदनामी आणि छळ करत आहे. कॉलेजने एक प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले आहे की, विद्यार्थ्याच्या असमाधानकारक वर्तनामुळे आणि शिस्तभंगाच्या रेकॉर्डमुळे त्याला पुढील शिफारसपत्र देण्यास नकार देण्यात आला. याउलट, प्रेम बिऱ्हाडेने पुरावे देत हे आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वी याच कॉलेजने आपल्याला शिफारसपत्रे दिली होती, मग आताच नकार का, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola