Pune Accident: कामगारांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटला, आठ मजूर गंभीर जखमी
Continues below advertisement
पुण्याजवळ साकोर्डी येथील निर्मळवाडी घाटात कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो उलटला आणि त्यामुळे हा गंभीर अपघात झाला. उताराच्या घाटात हा अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement