एक्स्प्लोर
Congress Protest : ऐन दिवाळीत राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, सरकारविरोधात संताप
ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात नागपूर (Nagpur), सांगली (Sangli) आणि सोलापूरमध्ये (Solapur) विविध प्रश्नांवरून आंदोलनं पेटली आहेत. अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांची दिवाळी सरकारने टाळी केल्याचा आरोप करत सोलापूरमध्ये काँग्रेसने (Congress) आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्येही रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांवरून काँग्रेसने महानगर पालिकेविरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे, सांगली शहरात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा विभागासमोर रिकाम्या बादल्या घेऊन खिया आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनांमुळे राज्यात ऐन सणासुदीच्या काळात सरकार आणि प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















