Pravin Darekar : राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर, वाद पेटला

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. 'आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात, तुम्हाला कोणी विचारलं?', असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. 'पलाट, शेण, घाण ही यांची टीका करायची पद्धत आहे, पण शेण कोण खातंय हे निवडणुकीत लोकं सिद्ध करतात', असे दरेकर म्हणाले. जे केवळ भावनिक राजकारण करतात त्यांच्या तोंडात लोक शेंदूर कोंबतील, असा इशाराही दरेकरांनी दिला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola