Prashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकाल

Prashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिलाय.त्यामुळे कोरटकर आता 28 मार्चपर्यंत कोठडीत राहणार आहे.  इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा गुन्हा असलेला प्रशांत कोरटकर याला सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात अटक केली होती. त्यानंतर प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्या मुसक्या आवळून त्याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. प्रशांत कोरटकर हा संपूर्ण वेळ वकिलांच्या युक्तिवादाकडे बारकाईने लक्ष ठेवून होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola