Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका, आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढ

कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) बाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयाने झटका देत आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या मागणीवर निर्णय देत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तो मी नव्हेच म्हणत गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अटक केल्यानंतर मंगळवारी (25 मार्च 2025) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज (28 मार्च) पूर्ण होत असून आज कोरटकरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टासमोर सादर केलं. तर न्याय‍धीश एस एस तट यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, इंद्रजीत सावंत यांच्या तर्फे अँड.असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले आहेत. तर प्रशांत कोरटकर यांच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola